breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WTC Final 2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून, असा असणार भारतीय संघ

WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये जागतिक कसोटी विजेतेपद फायनलची लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. फायनलपुर्वी ओव्हलची खेळपट्टी गवतामुळे चांगलीच चर्चेत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-१९, टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक ११-११ ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कौशल्यपणाला लावण्यासाठी आतूर झाले आहेत.

दोन्ही संघांमधील सामना ७ जून, बुधवारपासून लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सामना सुरू होईल.

हेही वाचा – राज्यावरील चक्रीवादळाचं संकट टळलं? मान्सूनही लांबला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहणे, केएस भारत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलिया संघ :

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, उस्मान खाजा, स्टीव्ह स्मिथ, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, स्कॉट बोलँड, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button