breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘आपल्या औकातीपेक्षा जास्त मिळालं तरच माणूस आनंदी राहतो’; नितीन गडकरी

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, त्यांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर जोरदार टोलेबाजी केली आहे. राजकारणातील असमाधानी लोकांबद्दल बोलताना आपला देश आणि समाज अतृप्त आत्म्यांचा महासागर असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, जीवनात कोणी समाधानी नाही, समाधान हे मानण्यावर आहे. आपण स्वीकारलं की माझ्या औकाद आणि हैसियत पेक्षा मला जास्त मिळालंय तर माणूस आनंदी राहतो. नाहीतर आज सर्वच दु:खी आहे. नगरसेवक दु:खी आहे कारण ते आमदार झाले नाही. आमदार दु:खी आहे की ते मंत्री झाले नाहीत. मंत्री यामुळे दु:खी आहे कारण त्यांना चांगलं खातं मिळालं नाही आणि आता जे मंत्री होणार होते ते यामुळे दु:खी आहे की आता त्यांनी संधी मिळते की नाही अशी त्यांना शंका आहे.

हेही वाचा – राज्यात लवकरच निवडणुका लागणार? राज्य निवडणूक आयोगाने दिले संकेत

गेल्या काही दिवसांपासून मंत्री होऊच अशा आविर्भावात फिरणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी भाष्य केले. मागील काही दिवस सर्व तयारच होते. सूट शिवून, घालतो आणि जातो असा त्यांचा तोरा होता. मात्र, आता त्या सुटाचं काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. कारण गर्दीच एवढी झाली आहे. या हॉलची क्षमता जास्त आहे, त्यामुळे किती लोकं आले, तरी ते बसू शकतात..मात्र मंत्रिमंडळाची क्षमता वाढवता येत नाही, त्यामुळे आपला देश आणि समाज दु:खी आत्म्यांचा महासागर आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button