TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

मोकळ्या भूखंडावरील कचरा उचलण्याचा खर्च भूखंड मालकांकडून वसूल केला जाणार

स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेकडून विविध उपक्रम राबवताना आता शहरातील खुल्या भूखंडावर उपद्रवी शोध पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आता शहरातील मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा उचलण्याचा खर्च संबंधित भूखंड मालकांकडून वसूल केला जाणार आहे. याबाबत कारवाई करण्यात आली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ११० भूखंड मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड असून अनेक लोक घरातील कचरा त्या भूखंडावर आणून टाकतात आणि त्यामुळे परिसरात डास आणि मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. अनेक भागातील मोकळ्या भूखंडांवर झाडे, गवत वाढले आहे तर काही ठिकाणी पाण्याची डबकी साचली आहे. त्यामुळे डास वाढले आहे. सर्वाधिक खुले भूखंड दक्षिण पश्चिम, पश्चिम आणि पूर्व नागपुरात आढळून आले आहे. महापालिकेने गेल्या पाच, सहा दिवसांपासून शहरातील दहाही झोनमधील अशा कचराघर करण्यात आलेल्या खुल्या भूखंडांचा तपास करून संबंधित भूखंड मालकांना सुरुवातीला नोटीस दिली जात आहे. त्यानंतरही भूखंडावर कचरा दिसून आला तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. गेल्या दोन महिन्यात ११० भूखंड मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय भूखंडावरील कचरा उचलण्याचा खर्च भूमालकांकडून वसूल केला जात असल्यामुळे अनेक मोकळ्या भूखंडाला संबंधीत भूखंड मालकांकडून कुंपण टाकणे सुरू केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

वर्षानुवर्षे बंद जुन्या वाहनांवरही दंड
शहरातील विविध भागात वर्षानुवर्षे जुनी वाहने उभी केली जात असून त्यावर महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार होती. त्याबाबत महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्यामुळे आता लवकरच महापालिका प्रशासनाकडून रस्त्याच्या कडेला असलेली आणि त्या ठिकाणी कचरा साचलेला असेल तर अशा ठिकाणचे वाहन जप्त करुन संबंधित वाहन मालकांकडून दंड वसुल केला जाणार आहे.

कचऱ्याची उचल करण्यासाठी घरोघरी कचऱ्याच्या गाड्या जात असताना अनेक घराच्या आसपास असलेल्या मोकळ्या भूखंडावर कचरा टाकतात. त्यामुळे ज्यांचा भूखंड असेल त्या भूखंडावर कचरा असेल तर त्यांच्यावरच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कचरा उचलण्याचा खर्च सुद्धा त्यांच्याकडून वसूल केला जाईल. – डॉ. गजेंद्र महल्ले, आरोग्य अधिकारी (घनकचरा) महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button