मराठवाडामहाराष्ट्र

मुंबईहून निघालेल्या एक्सप्रेसचे डबे अन् इंजिन झालं वेगळं; भितीने प्रवासी झाले…

जळगाव |  जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्टेशन नजीक वागळे गावाजवळ एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन हे वेगळे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कुठलीही जीवित किंवा अनुचित घटना घडलेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (गाडी नंबर १२१४१) ही एक्सप्रेस मुंबईकडून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी गावाजवळ या धावत्या एक्सप्रेसचे इंजिन आणि डबे हे वेगवेगळे झाले. घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले, त्यानंतर पुन्हा डबे सोडून पुढे गेलेले इंजिन परत मागे आणण्यात येऊन डब्यांना जोडण्यात आले.

या घटनेनंतर एक्सप्रेसमधील नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले होते, सर्व प्रवासी डब्यांच्या बाहेर पडले. घटनेत प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जिवित किंवा कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही अशी माहिती मिळाली आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एक्सप्रेसचे वेगळे झालेले इंजिन पुन्हा जोडण्यात येऊन एक्सप्रेसला दुरुस्तीसाठी भुसावळ येथे नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. भुसावळ येथे या एक्सप्रेसची दुरुस्ती केली जाणार असल्याचेही समजते. दरम्यान इंजिनपासून डबे वेगळे होण्याच्या या घटनेवरून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून राग व्यक्त केला जात आहे. सुदैवाने कुठलीही घटना घडली नाही, मात्र जर दुर्घटना घडली असती तर त्यास जबाबदार कोण असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

तीन डबे वेगळे झाले होते

गाडीमधील गार्डला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने वायरलेसवरून लोकोपालटला ही घटना कळवली. त्यानंतर डब्ब्यापासून पासून वेगळे झालेले इंजिन पुन्हा डब्यांना जोडण्यात आले अशी माहिती मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button