ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उत्तर कोल्हापुरात भाजप की महाविकास आघाडी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आज मतदान

कोल्हापूर |संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणी १६ एप्रिल रोजी होणार आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे होत असलेल्या या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने जयश्री जाधव, तर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना यावेळी पाहायला मिळणार आहे. अधिक माहितीनुसार, या निवडणुकांसाठी एकूण २ हजार १४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तर ३५७ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर या मतदानासाठी तब्बल ५०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कोल्हापूरमध्ये तैनात करण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारकडून काँग्रेसच्या जयश्री पाटील या रिंगणात तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खरंतर, या निवडणुकांच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. आरोप-प्रत्यारोप झालेत, त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार? हे पाहणं सगळ्यांसाठीच उत्सुकतेचा आहे.

दरम्यान, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ही पोटनिवडणूक जिंकत राज्यातील भाजपचा १०७ वा आमदार निवडून येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील कोल्हापूरच्या जनतेला संबोधित करत कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जयश्री जाधव याच निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांपैकी कोणाचा विश्वास खरा ठरणार? कोल्हापूरची जनता कोणाला कौल देणार? हे येणारा काळच सांगेन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button