breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

नवीन वर्षात ‘या’ कंपन्यांच्या गाड्या महागणार!

नवीन वर्ष महागाईचे असणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आतापासून तुमचे बजेट थोडे वाढवा. याचे कारण म्हणजे १ जानेवारीपासून अनेक कंपन्यांच्या कारच्या किमती वाढणार आहेत.

ऑडी इंडिया : जर्मन लक्झरी ब्रँड ऑडी इंडियाने आपल्या मॉडेल रेंजमध्ये समान २ टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. कंपनीमध्ये सध्या देशात A4, A6, A8 L sedan, Q3, Q3 Sportback, Q5, Q7, Q8 SUV, S5 स्पोर्टबॅक स्पोर्ट्सकार आणि Q8 e-tron, Q8 Sportback e-tron आणि e-tron GT इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे.

मारुती सुझुकी : देशातील आघाडीच्या आणि सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने आपल्या कारच्या किंमती वाढीसाठी उत्पादन खर्चाचा उल्लेख केला आहे. ही वाढ कारच्या प्रत्येक मॉडेलनुसार वेगवेगळी असणार आहे. मारुती सुझुकी सध्या Alto, Baleno, Brezza, Celerio, Ciaz, Dezire, Eeco, Ertiga, Grand Vitara, Ignis, S Presso, Swift, Wagon R, XL6, FrontX, Invicto आणि Jimny सारख्या गाड्या देशात विकते.

महिंद्रा : महागाई आणि वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे जानेवारी २०२४ पासून वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचे संकेतही महिंद्रा अँड महिंद्राने दिले आहेत. कंपनी सध्या XUV300, XUV700, Bolero, Bolero Neo, Scorpio N, Scorpio Classic, Marazzo, Thar आणि XUV 400 EV सारख्या कार देशात विकते.

हेही वाचा  –  गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय! संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता ‘या’ दलाकडे 

होंडा : होंडा इंडियाने वाढत्या उत्पादन खर्चामुळे जानेवारी २०२४ पासून त्यांच्या सर्व चारचाकी वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. Honda सध्या भारतात 3 कार विकते, ज्यात City, Amaze आणि Elevate SUV चा समावेश आहे.

ह्युंदाई : Hyundai India ने घोषणा केली आहे की वाढत्या इनपुट खर्चामुळे १ जानेवारी २०२४ पासून सर्व वाहनांच्या किंमती वाढवल्या जातील. कंपनी सध्या Alcazar, Aura, Creta, Exeter, Grand i10 Nios, i20, Ioniq 5, Kona Electric, Venue, Verna आणि Tucson भारतात विक्री करते.

BMW : वाढत्या इनपुट खर्चामुळे BMW इंडिया १ जानेवारी २०२४ पासून त्याच्या मॉडेल रेंजमधील किंमती २ टक्क्यांनी वाढवेल. कंपनी सध्या 2 सीरिज ग्रॅन कूप, 3 सीरिज ग्रॅन लिमोझिन, M 340i, 5 सीरिज, 6 सीरिज, 7 सीरिज, X1, X3, X5, X7, Z4, M4 Coupe, X3 M40i, X4 M40i, M5, M8 कूप, XM iX1, i4, i7 आणि iX विक्री करते.

Citroen : Citroen ने जाहीर केले आहे की, ते १ जानेवारी २०२४ पासून कारच्या मॉडेल रेंजमध्ये किंमती वाढवतील. ही वाढ बाजारातील विविध कारणांमुळे झाली असून ती 2.5-3 टक्क्यांपर्यंत असेल असे कंपनीने म्हटले आहे. कंपनी सध्या C3, eC3, C3 Aircross आणि C5 Aircross भारतात विक्री करते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button