breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

नवरात्रौत्सव 2022: नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी प्रसादाचे नऊ गोड पदार्थ

Navratrautsav 2022: Nine Sweet Dishes of Prasad for Nine Days of Navratri Journey

पुणे । महाईन्यूज ।

नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी प्रसादाचे नऊ गोड पदार्थ थोडं पण कामाचंनवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी प्रसादाचे नऊ गोड पदार्थ नवरात्रीतल्या प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा परंपरागत प्रसाद कधी आहे याबाबत जाणून घेणार आहोत… खास महाईन्यूजच्या वाचकांसाठी…

शारदीय नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस नऊ रुपात देवीला सजवतात आणि तिची पूजा करतात. देवीला भक्तिभावाने अर्पण केलेला प्रसाद ती स्वीकारते. नवरात्रीत नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात तसेच प्रत्येक दिवशी देवीला वेगळा प्रसाद दाखवतात. प्रसाद दाखवल्यानंतर तो पदार्थ कुटुंबातील सदस्य, नातलग, गरजू आदी अनेकांना वाटला जातो. जास्तीत जास्त लोकांना प्रसाद ग्रहण केल्याने देवीचा आशीर्वाद लाभेल ही त्या मागची भावना असते. यासाठी अनेकजण नऊ दिवस नऊ प्रकारचे गोड पदार्थ प्रसाद म्हणून तयार करतात.

नवरात्रीत देवीला नैवेद्य म्हणून पहिल्या दिवशी तूप, दुसऱ्या दिवशी साखर, तिसऱ्या दिवशी दूध अथवा खीर किंवा दुधापासून तयार केलेला पदार्थ, चौथ्या दिवशी मालपुआ, पाचव्या दिवशी केळी, सहाव्या दिवशी मध, सातव्या दिवशी गुळ, आठव्या दिवशी नारळ, नवव्या दिवशी हरभरा-खीर किंवा तीळ हे पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. पण हल्ली परंपरागत पदार्थांसोबतच नवरात्रीत देवीसमोर गोड पदार्थ प्रसाद म्हणून ठेवण्याची पद्धत रूढ होत आहे. चला तर मग जाणून घेऊ नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कोणता गोड पदार्थ प्रसाद म्हणून तयार करता येईल…

  1. तांदुळाची खीर
    साहित्य : १ लि. दूध, १०० ग्रॅम साखर, एक चमचा हिरवी वेलचीपूड, केशर, बदाम, मनुका

कृती : एक वाटी तांदुळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे. नंतर बाउलमध्ये पाण्यात पंधरा मिनिटे भिजवा. दूध तापवून घ्या. दूध तापल्यावर गॅस बंद करून त्यावर केशर घालून दूध ढवळा. पुन्हा दुधाला छोटी उकळी द्या. वाटून घेतलेले तांदुळ दुधात मिसळा आणि दूध ढवळून घ्या. दूध घट्ट होताच त्यात सुकामेवा अर्थात बदाम, मनुका घाला. चवीनुसार आणि आवडीनुसार वेलचीपूड घाला आणि ढवळून घ्या. तीन मिनिटे खीर शिजवा. गॅस बंद करा.

  1. मालपुआ
    साहित्य : १०० ग्रॅम खवा किंवा मावा, पाव कप मैदा, ५० ग्रॅम रवा, अर्धा चमचा जाड कुटलेली बडीशेप, तळायला तूप, पाव लिटर दूध. तसेच साखरेच्या पाकासाठी ३०० ग्रॅम साखर, अर्धा लिटर पाणी, केशर.

कृती : साखर पाण्यात मिसळून ते पाणी मंद आचेवर ठेवा. साखर विरघळून पाक तयार होईल. हा पाक बाजुला काढून घ्या. आता मावा, मैदा आणि रवा यांचे मिश्रण एकजीव करा आणि व्यवस्थित मळून घ्या. यासाठी थोडे दूध वापरा. आता तयार कणेकर वेलचीपूड आणि केशर वरून ओता आणि व्यवस्थित मिसळवा.

आता मालपुवा करण्यासाठी कढीत २०० ग्रॅम तूप घ्या. तूप व्यवस्थित तापले की मालपुआ मिश्रणाचे चपटे गोळे तयार करून तुपात तळण्यासाठी सोडा. मालपुआ तळून किंचित सोनेरी रंगाचा झाला आणि कढईच्या कडेला आला की काढून घ्या. एका मिश्रणात आठ ते दहा मालपुआ तयार होतील. तयार मालपुआ साखरेच्या पाकात किमान दोन मिनिटे भिजवा. नंतर मालपुआ थंड रबडीसोबत किंवा नुसते खावे

  1. रव्याचा गोड शिरा
    साहित्य : 1 कप रवा, 1 कप साखर, 1/2 कप तूप, 1/2 कप दूध, 2 1/2 कप पाणी, वेलचीपूड, काजू, मनुका

कृती : पॅनमध्ये तूप तापवा, आता पॅनमध्ये रवा ओतून मंद आचेवर खरपूस भाजा. रव्याचा रंग चॉकलेटी होऊ लागताच रव्यात दूध मिसळा. रवा आणि दुधाचे मिश्रण घट्ट झाल्यानंतर यात अडीच कप पाणी आणि साखर घालावी. सर्व सामग्री ढवळत राहा म्हणजे मिश्रण पॅनला चिकटणार नाही. नंतर तयार मिश्रणात काजूचे काप आणि मनुके घालावे. चिमूटभर वेलची पावडर देखील मिक्स करावी. तयार झाला आहे गोडाचा शिरा.

  1. पुरणपोळी
    कृती : साहित्य : 200 ग्राम चणाडाळ
    200 ग्रॅम गूळ
    150 ग्रॅम मैदा
    1/4 टीस्पून हळद
    चवीपुरते मीठ
    2 टेबलस्पून तेल
    3 टेबलस्पून मैदा (पोळी लाटण्यासाठी) अथवा कणीक
    1/2 टीस्पून वेलची पावडर
    1/2 कप दूध
    पुरणपोळीसाठी तूप

कृती : चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. गूळ किसून घ्या. शिजलेल्या चणाडाळीमध्ये गूळ आणि साखर मिक्स करा. दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात वेलची पावडर घाला. पुरण तयार आहे. नंतर पुरण यंत्रातून पुरण वाटून घ्या. मैदा हलक्या हाताने मळा. पुरणाचा गोळा पोळीत भरून घ्या. पराठा लाटतात तशी हलक्या हाताने पुरणपोळी लाटा. नंतर या पुरणपोळ्या शेकून घ्या.

  1. गोड बुंदी
    कृती : अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी एकत्र करून कमी आचेवर शिजवून घ्या आणि पाक करा. नंतर पाकात आवडीनुसार वेलची पूड, केशर टाकू शकता. हा पाक बाजूला ठेवा. आता बाउलमध्ये अर्धा कप बेसन, थोडं थोडं पाणी टाकत एक मिश्रण तयार करा. मिश्रण जास्त पातळ किंवा जाडसर राहायला नको. (या मिश्रणाचे सर्वसाधारण प्रमाण – 1 कप बेसन आणि 3/4 कप पाणी) मोहनासाठी 2 लहान चमचे तेल त्यात टाका आणि मिक्स करा.साहित्यकढईत तेल गरम करुन घ्या. तेल अति गरम करु नका. बुंदीच्या झाऱ्यातून बेसनचे मिश्रण कढईत सोडा. जरा बुंदीचा रंग जास्त गडद न येताच ती बाहेर काढा. (बुंदी लाल होईपर्यंत तळू नका). आधी तयार केलेल्या साखरेच्या पाकात तळलेली बुंदी टाका, मिक्स करा आणि छाकून ठेवा. तासाभराने पुन्हा एकदा बुंदी मिक्स करा आणि छाकून ठेवा. 7 ते 8 तास तसंच राहू द्या. जेणेकरून पाक बुंदीत पूर्णपणे मुरलेला असेल. (ही रेसिपी रात्री करुन दुसऱ्या दिवशी सकाळी बुंदी तयार असेल.) गोड बुंदी तयार.
  2. घेवर
    भांड्यात एक वाटी मैदा, तूप आणि दूध मिक्स करून घ्या नंतर त्यात थोडे थोडे पाणी टाका आणि पातळ पीठ बनवून घ्या. पॅनमध्ये तूप तापवायला ठेवा. तूप तापले की त्यात हे मिश्रण हळूहळू डावाने टाका म्हणजे जाळीदार घेवर तयार होईल. घेवर रबडीसोबत किंवा साखरेच्या पाकात घोळवून खाता येतील. पाकासाठी साखर पाण्यात मिसळून ते पाणी मंद आचेवर ठेवा. साखर विरघळून पाक तयार होईल.
  3. फळं किंवा फळे
  4. दुधापासून तयार होणारे मिठाईचे पदार्थ किंवा मिठाई : पेढा, मिठाई, गुलाबजाम, रसगुल्ला
    9 . शिंगाड्याच्या पिठाचा हलवा
    साहित्य : तूप – २ टेबलस्पून
    शिंगाडा पीठ – १ वाटी
    दूध – अर्धी वाटी
    साखर – पाव वाटीपेक्षा किंचित जास्त
    वेलचीपूड, जवळ असलेला सुकामेवा

कृती : कढईत तूप गरम करून त्यावर शिंगाड्याचे पीठ परतून घ्यावे. साधारण २-३ मिनिटे परतल्यावर गोडुस वास येऊ लागेल. या परतलेल्या पीठावर थोडे थोडे दूध सोडून सतत परतत राहावे. यामुळे पीठ फुलते. पाण्यापेक्षा दूध वापरल्याने चविष्ट लागते. वरून साखर घालून पुन्हा ढवळावे. साखरेमुळे थोडा ओलसरपणा येईल. झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजू द्यावे. शिंगाड्याचे पीठ पटकन करपते त्यामुळे सारखे ढवळत राहणे गरजेचे आहे. गॅस बंद करून त्यात वेलची पूड घालून ढवळावे आणि आवडेल तो सुका मेवा, बदाम काजू अक्रोड पिस्ता, घालावा. झाकण बंद करून २ मिनिटे तसेच ठेवावे. आणि पोटभर खावे.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button