breaking-newsपिंपरी / चिंचवड
कामगार नगरीत दत्त जयंती उत्साहात
पिंपरी ( महा ई न्यूज ) – भोसरी औद्योगिक क्षेत्रातील डायनोमर्क कंट्रोलस् कंपनीच्या वतीने दत्त जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी दत्त मंदिराला रंगरंगोटी करुन आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली. याप्रसंगी दत्त मंदिरात विधीवत पुजा-अर्चा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत व संचालिका अमिता राऊत यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी दत्त जयंती निमित्ताने कंपनीतील सर्व मशीनरीसह परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सुर्यकांत मुळे, आण्णा जोगदंड, विभाग प्रमुख हर्षल शेळके, प्रविण बाराथे, अक्षरा राऊत, दिलीप ईधाते, मोहनकृशनन, प्रिया देशमुख, रवी भेंनकी, स्वप्नील देशपांडे, एल्लापा पौगुडवाले, जयंत राऊत, डाँमनिक स्वामी आदी उपस्थित होते.