breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेट्रो लवकरच पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत दाखल होईल; निगडीपर्यंत मेट्रोचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात – श्रीरंग बारणे

  • खासदार बारणे यांनी केली मेट्रोची सफर

पिंपरी | प्रतिनिधी 
पुणे महामेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या कॉरिडॉरचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मेट्रो लवकरच पिंपरी-चिंचवकरांच्या सेवेत दाखल होईल. नागरिकांना जलद प्रवास करता येणार आहे. कमी वेळेत पुणे, स्वागरगेटपर्यंत पोहचता येईल. मेट्रो सुरु झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. पिंपरी ते निगडी मेट्रोचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी माझा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आज (मंगळवारी) मेट्रोच्या कामाची पाहणी केली. फुगेवाडी ते पिंपरी पर्यंत मेट्रोने प्रवास केला. फुगेवाडी ते पिंपरी दरम्यानच्या पाच स्टेशनच्या कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामाची संपूर्ण माहिती, मेट्रो चालू करण्यासाठी येणा-या अडचणी खासदार बारणे यांनी जाणून घेतल्या. मेट्रोस सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे, राजेश त्रिवेदी, राजीव कुमार, शहरप्रमुख, नगरसेवक सचिन भोसले, शिरुरच्या महिला संघटिका सुलभा उबाळे, शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी नगरसेवक संजय काटे, सरिता साने, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, बशीर सुतार, तुषार नवले, संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पुणे महामेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या कॉरिडॉरचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. स्टेशनची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. मेट्रो लवकरच चालू होईल. तिकिट दरही 10 ते 50 रुपये असा राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मेट्रोचा प्रवास परवडणारा आहे. शहरातील पहिली मेट्रो आहे. मेट्रो प्रवासाचा वेगळ आनंद पिंपरी-चिंचवकरांना मिळणार आहे. केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून उभा राहिलेला महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मेट्रोचे काम चांगले झाले आहे. मेट्रो लवकरच पिंपरी-चिंचवकरांच्या सेवेत दाखल होईल. नागरिकांना जलद प्रवास करता येणार आहे. मेट्रो सुरु झाल्यावर रस्त्यावरील वाहतुकीचा ताणही कमी होईल. स्मार्ट सिटीची ओळख लवकरच मेट्रो सिटी होईल”.

निगडीपर्यंत मेट्रो धावणार

पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचे विस्तारीकरण होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. केंद्र, राज्य सरकारच्या अर्थ विभागाने निगडीपर्यंतच्या मेट्रोला मान्यता दिली आहे. आता केंद्राने फेरप्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. राज्य सरकारचा आर्थिक सहभाग मागितला आहे. राज्य सरकार आपला आर्थिक सहभाग देऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठवेल. त्यानंतर प्रत्यक्षात निगडीपर्यंतचे काम सुरु होईल. त्यासाठी माझा केंद्र, राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button