breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या जम्बो कोविड सेंटरमधून ऑक्सिजनचा अपव्यय

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आॅक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयात ऑक्सिजनचा अपव्यय झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येतात. जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन वाया गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या कोविड सेंटरमधील एका वार्डात एकही रुग्ण नसतांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच ठेवण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून नेमण्यात आलेल्या एका पथकाद्वारे रुग्णालयातील ऑक्सिजनच ऑडिट केलं जातंय. या पथकाने भेट देऊन जम्बो कोविड सेंटरची पाहिणी केली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान मोकळ्या वार्डात ऑक्सिजन सुरूच ठेवल्याने काही टन ऑक्सिजन वाया गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जम्बो कोविड सेंटर चालकाकडून या बेफकिरी संदर्भात लेखी खुलासा मागविण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी आणि नोडल अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतर राज्यांतही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे कोविड बाधित रुग्णांचे प्राण जात आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी इतर राज्यांतून टँकर्स आणि रेल्वेद्वारे ऑक्सिजन आणण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button