ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या विद्यार्थी संघटनेच्या विविध पदांची नियुक्ती जाहीर

प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या हस्ते संघटनेच्या विविध पदांची देण्यात आलीजबाबदारी

पिंपरीःचिंचवड: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पिंपरी चिंचवड शहर आयोजीत “विद्यार्थी संवाद – सायकल दौरा” या उपक्रमाचा समारोप समारंभ आज पार पडला. गेले महिनाभर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शहरातील विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या दौऱ्याच्या दरम्यान शरदचंद्रजी पवार यांच्या विचार प्रवाहात सामील होत, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेत काम करण्याची भूमिका घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या हस्ते संघटनेच्या विविध पदांची जबाबदारी देण्यात आली. निगडी येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, संदीप चव्हाण, सागर तापकीर, सचिन निंबाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून संघटना बांधनीवर भर देण्यात येत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या कडून दोन महिन्यांपूर्वी राहुल आहेर यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर शहरातील विविध महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन संवाद दौऱ्याच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काल त्या दौऱ्याचा समारोप करण्यात आला.

नवनियुक्त पदाधिकारी
1)राहुल नेवाळे मुख्य प्रवक्ता. पिंपरी चिंचवड शहर.
2)अक्षय शेडगे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर.
3) ऋषिकेश सत्रे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर.
4) वैष्णवी पवार सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर.
5)ऋषभ भडाळे. सचिव पिंपरी चिंचवड.
6) ज्ञानेश्वर पुदाले संघटक पिंपरी चिंचवड.
7) तुषार गाडे सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर.
8) प्रतीक्षा पठारे. समन्वयक पिंपरी चिंचवड
9) हर्षद परमार. चिंचवड विधानसभा अध्यक्ष.
10) चैतन्य बनकर. मुख्य सरचिटणीस भोसरी विधानसभा.
11) विश्वजीत लोंढे. अध्यक्ष रामकृष्ण मोरे महाविद्यालय.
12) अनुष्का काळभोर. उपाध्यक्ष रामकृष्ण मोरे महाविद्यालय.
13) अंकिता नाटेकर विद्यार्थिनी प्रतिनिधी. रामकृष्ण मोरे महाविद्यालय.
14) युवराज माने महाविद्यालय सरचिटणीस रामकृष्ण मोरे महाविद्यालय.
15) सिद्धी माळी. सचिव रामकृष्ण मोरे महाविद्यालय.
16) ज्ञानेश्वर वाघमारे सचिव भोसरी विधानसभा.
17) योगेश देशमुख. सोशल मीडिया समन्वयक पिंपरी चिंचवड शहर.
18) गणेश उंडाळकर. अध्यक्ष बालाजी लॉ कॉलेज.
19) सार्थ निकम उपाध्यक्ष बालाजी लॉ कॉलेज.
20) फैजान इलाही तांबोळी. प्रभाग अध्यक्ष कासरवाडी.
21) ऋतिक गायकवाड प्रभाग अध्यक्ष पिंपरी.
22) अभिषेक कांबळे. अध्यक्ष महात्मा फुले महाविद्यालय.
23) राहुल मोरे अध्यक्ष. महात्मा फुले ज्युनिअर महाविद्यालय.
24)कमलेश दत्तात्रय ढवळे
शहर सह संघटक पिंपरी चिंचवड
२५)रोहीत कचरे
अध्यक्ष प्रभाग २४
26)शुभम पाटील
उपाध्यक्ष प्रभाग २४
27)सुजय पाटील
सरचिटणीस प्रकाश २४
28)जगदीश गपाट
अध्यक्ष प्रभाग २६
29)दत्ता कांबळे
उपाध्यक्ष प्रभाग २६
30)अमर जाधव
अध्यक्ष प्रभाग २५
31)अविनाश गव्हाणे उपाध्यक्ष प्रभाग २५

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button