breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

इस्रायल-हमास युद्धावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले..

मुंबई : इस्रायल-हमास युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. इस्रायल हमास युद्धाने जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल होईल की नाही माहिती नाही, पण भारतही त्यात अडकेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, इस्रायल हमास युद्ध हा खूप महत्त्वाचा विषय आहे. या युद्धाची व्याप्ती वाढली, तर तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल होईल की नाही माहिती नाही, पण भारतही त्यात अडकेल. जगाला त्या भागातूनच कच्चे तेल (क्रुड ऑईल) पोहचते. आपण आधीच महागाईने ग्रासलो आहोत. आपण आधीच महागाईने ग्रासलो आहोत. अशावेळी कच्चा तेलाची किंमत वाढली, तर आपली अर्थव्यवस्थाही कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे.

हेही वाचा – पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजीत तावरेंची निवड, कोण आहेत रणजित तावरे? 

भारत सरकारने योग्य पावलं उचलली नाहीत, तर भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात अडकला जाईल. संकटकाळात भारत नेहमीच माणुसकीच्या दृष्टीने नेहमीच मदत करत असतो. त्यामुळे इस्रायल हमास युद्धात भारताने ती माणुसकीच्या दृष्टीने मदतीची भूमिका तरी पार पाडायला हवी, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button