संभाजी भिंडेसह धारक-यांना पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारली
- पालखी सोहळा समिती अध्यक्षांचे पुणे पोलिसांना पत्र
पुणे – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि त्यांच्या धारकरी कार्यकर्त्यांना यंदाही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या अध्यक्षांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. या पत्रात, संभाजी भिडेंना पालखी सोबत चालन्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे सांगितले आहे.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख यांनी परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहावा, अशी मागणी केली आहे. तर संभाजी भिडे गुरुजी यासोबतच त्यांच्या कार्यक्रत्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे जाऊ देऊ नये असे पालखी सोहळा प्रमुखांनी बजावले आहे. मागच्या वर्षी प्रमानेच पालखीच नियोजन करण्यात यावे, अस पत्र दिंडी संघटनेचे मारुती कोकाटे यांनी पुणे पोलिसांना दिले आहे.
दरम्यान बुधवारी संभाजी भिडे आणि त्यांचे समर्थक हे पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमा होणार आहेत. यानंतर सर्व पालख्या पुढे गेल्यानंतर ते सोहळ्यात सहभागी होणार आहेत. शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत ते चालणार आहेत.