TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

थंडीत अंथरून सोडावंस वाटत नसेल तर या टिप्स करा फॉलो, हमखास होईल फायदा!

प्रत्येकाला लवकर उठणं हे जमत नाही कारण आता उशिरा म्हणजचे काहीजण मध्यरात्री झोपत असल्यामुळे त्यांना सकाळी उठायला जमत नाही. आता थंडी असल्यामुळे तर अंथरूणातून बाहेर जावंसही वाटत नाही. कारण बाहेर इतकी कडाक्याची थंडी पडती की दात कटकट वाजतात. त्यामुळे सकाळी गजर वाजला की अनेकजण तो बंद करतात. जर तुम्हाला लवकर उठायचं असेल तर काही टिप्स आहेत याने तुम्ही सकाळी आरामात उठू शकता. 

आता लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाला मोबाईलचं व्यसन लागलं आहे. काहीजण रात्रभर फोनवर असतात, कोण चित्रपट पाहतं तर कोण फोनवर बोलत बसतं. मात्र याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होतो. तुम्ही रात्री झोपण्याच्या 1 तास आधी तुमचा फोन बंद करा आणि शांत झोपा. कितीही इच्छा झाली तर फोन हातात घेऊ नका. याचा फायदा असा होईल की तुम्हाला शांतपणे झोप लागेल. 

झोपेची एक वेळ ठरवून घ्या, एकदा का तुमच्या शरीराला जर वेळेवर झोपण्याची सवय लागली तर त्या वेळेला तुम्हाला रोज झोप येईल.  एक वेळ अशी येते जेव्हा आपण अगदी त्याच वेळी सकाळीही उठू लागतो. किमान 7 ते 8 तास झोप घ्या. जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्ही निरोगी राहाल आणि तुम्हाला गजरची गरज लागणार नाही.

गजर वाजल्यावर तुम्ही तो बंद करून परत झोपता, असं न करता गजर वाजल्यावर उठून रूममधील लाईट्स चालू करा आणि डोळे उघडे करून बसा. काही वेळाने तुमच्या खोलीत फिरायला सुरूवात करा जेणेकरून तुमची झोप जाईल. त्यामुळे बाकी कामेही वेळेत होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button