breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यातून मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन धावणार

सोलापूर – भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून मुंबई-हैदराबाद या ७२१ किमी लांबीच्या हाय स्पीड रेल कॉरिडॉर म्हणजेच बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्याच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वेक्षण प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२ गावांतून ही बुलेट ट्रेन धावणार आहे.

या बुलेट ट्रेनचा मार्ग माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्‍यातील ६२ गावांतून जाणार असून उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्‍यात सामाजिक सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी १७.५ मीटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार असून या जागेतील शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी होणाऱ्या सामाजिक परिणाम व पुनर्वसनासाठी सध्या दोन तालुक्‍यातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. बुलेट ट्रेनचा मार्ग जाणाऱ्या तालुक्‍यातील गावांमध्ये माळशिरस तालुका-१३ गावे, पंढरपूर तालुका-१८ गावे, मोहोळ तालुका-१० गावे, उत्तर सोलापूर-८ गावे, दक्षिण सोलापूर- गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button