breaking-newsराष्ट्रिय

हाफिज सईदचे खुलेआम फिरणे चिंतेचा विषय – अमेरिका

वॉशिंग्टन – मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि मास्टरमाइंड हाफिज सईद पाकिस्तानात खुलेआमपणे फिरत आहे. ही बाब अमेरिकेसाठी मोठी चिंतेची बाब आहे. आम्ही त्याच्या अटकेसाठी बक्षिस जाहीर केले आहे, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्ता हीथर नोर्ट यांनी सांगितले.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वक्तव्याबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.भारत-अमेरिकेच्या संबंधाबाबत नोर्टे म्हणाल्या, नरेंद्र मोदी यांच्या सरकारशी अमेरिकेचे दृढ संबंध आहेत. तसेच भारतच्या विदेश मंत्रालयाशीही आमचे जवळचे संबंध आहेत. हीथर नोर्ट यांनी यापूर्वीही हाफिज सईदबाबत चिंता व्यक्‍त केली होती. हाफिज विरोधात पाकिस्तानने खटला चालविला पाहिजे, असे त्यांनी जानेवारी महिन्यात म्हटले होते. दरम्यान, नवाज शरीफ यांनी मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे म्हटल्यानंतर पाकिस्तानात त्यांना कडाडून विरोध होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button