breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरे सरकार संकटात! पण महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना नेत्यांची दांडी

मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांकडे धाव घेत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. अखेर राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांच्या या आदेशानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. सरकार वाचवण्यासाठी आता महाविकास आघाडी सरकार आक्रमक झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी तातडीने बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, या बैठकीत शिवसेनेचे नेते मात्र अनुपस्थित होते. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. (Maharashtra Political Turmoil)

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक तातडीने बैठकी बोलवण्यात आली होती. या बैठकीत सरकार वाचवण्यासाठी काय रणनिती आखावी लागेल. तसंच, बहुमत चाचणी रोखण्यासाठी काही डावपेच असतील यावर आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली. शरद पवार यांनी बोलवलेल्या या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे नेते मात्र गैरहजर होते. शिवसेनेकडून अनिल देसाई व अनिल परब उपस्थित राहण्याची शक्यता होती. मात्र, बैठक संपेपर्यंत शिवसेनेचे नेते पोहचलेच नाहीत. बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे नेते पवारांच्या घरातून रवाना झाले. शिवसेनेचे नेते महाविकास आघाडीच्या बैठकीला पोहचले नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

बहुमत चाचणीसाठी राष्ट्रवादीचे चार आमदार गैरहजर

Maharashtra Floor Test: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्यक विकास मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मंत्री बहुमत चाचणीसाठी गैरहजर असण्याची शक्यता आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं ते क्वारंटाइन असल्याने उद्याच्या बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. तर, नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार उद्याच्या या निर्णयाक प्रसंगी हजर राहणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button