देश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

देवेंद्र फडणवीसांची राज्यातच नाही तर केंद्रात एन्ट्री, मोदींनी दिली मोठी जबाबदारी

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर जवळपास दीड महिना पूर्ण झाला आहे. आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. परंतु राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळालं आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आता केंद्रात स्थान मिळालं आहे. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज घोषणा केली असून महाराष्ट्रातून फडणवीसांना स्थान देण्यात आलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यामध्ये देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर सदस्यपदी पीएम नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येदीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटीया, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, श्रीमती वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर बीएल संतोष हे सचिवपदी असणार आहेत. दरम्यान, भाजपच्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या १५ बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button