पिंपरी / चिंचवड

महामार्गाच्या कडेला टेम्पो पार्क करून झोप काढणं पडलं महागात : टेम्पोला कार धडकली, दोघांचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

बेंगलोर-मुंबई महामार्गाच्या बाजूला टेम्पो पार्क करून चालक झोपी गेला. दरम्यान या टेम्पोला कारने धडक बसली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 5) मध्यरात्री पुनावळेगाव येथे घडली.

संगप्पा भगणे व शंकर कांबळे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. तर याच मोटारीमधील भीमाशंकर आयवाळे आणि उचप्पा कांबळे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आयशर टेम्पो (एम एच 04 / के एफ 5620) यावरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इरण्णा बसवंत कांबळे (वय 31, रा. खोपोली, ता. खानापुर, जि. रायगड) यांनी शनिवारी (दि. 5) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो चालक याने महामार्गालगत आपला टेम्पो उभा करून झोपी गेला. त्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (एम एच 02 / इ व्ही 5518) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला अपघात होईल अशा रितीने टेम्पो उभा करून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अपघात झाला आहे हे माहिती असूनही जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न देता त्या ठिकाणावरुन टेम्पो चालक पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button