breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील औषध कंपन्यांना कोरोना प्रतिबंधक औषधे उत्पादन करण्याची परवानगी द्या – संदीप काटे

  • उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याकडे केली मागणी
  • लसीचे उत्पादन वाढल्यास शंभर टक्के लसीकरणाला विलंब लागणार नाही

पिंपरी / महाईन्यूज

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील औषध निर्माण करणा-या शासकीय व खासगी कंपन्यांना कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिवीर औषधे निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात काटे यांनी प्रसिध्दीस निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भीषण होत चालले आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत शहरातील अनेकांचे प्राण गेले आहेत. वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. बेड उपलब्ध असतील तर नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. बाधित रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. रुग्णांना वाचवण्यात त्यांना यश देखील येत आहे. ही समाधानाची बाब आहे.

कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात केली आहे. परंतु, लसीकरणाची प्रक्रिया किचकट असल्यामुळे अनेकांना त्याचा लाभ घेता येत नाही. लस उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा लसीकरण केंद्र बंद ठेवली जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहराची सध्याची लोकसंख्या अंदाजे 27 लाखांच्या पुढे आहे. याच्या तुलनेत लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रशासकीय काम थांबत आहे, असेही काटे यांनी म्हटेल आहे.

शहरात लसीकरण प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध करणे गरजेचे आहे. लसीवर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्यामुळे त्यांच्याकडून होणारा लसीचा पुरवठा कमी पडत आहे. लसीचा साठा वाडवण्यासाठी पिंपरी-चिंचवड व पुण्यातील औषध निर्माण करणा-या कंपन्यांना लसीबरोबरच कोरोना प्रतिबंधक औषधे निर्माण करण्याची परवानगी द्यायला हवी. पिंपरीतील हिंदुस्तान एण्टीबायोटिक्स कंपनी लस उत्पादन करण्यास तयार आहे. परंतु, केंद्र सरकारकडून कंपनीला परवानगी दिली जात नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंतही काटे यांनी व्यक्त केली आहे.

औषधे निर्माण करण्याचे पेटंट दिले जात नसल्यामुळे शहरातील औषध निर्माण कंपन्याची क्षमता असलेल्या कंपन्या देखील त्याचे उत्पादन करू शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक औषधे आणि लस निर्माण करण्याचे संबंधित कंपन्यांकडून पेटंट घ्यावे. ते शहरातील हिंदुस्तान एण्टीबायोटिक्स या शासकीय कंपनीसह खासगी औषध कंपन्यांना देऊन त्यांना कोरोना प्रतिबंधक औषधे व लस उत्पादन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button