breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत रविवारी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांना मिळणार उजाळा

  • भोसरीत होणार किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याचा जागतीक उपक्रम
  • आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 5 जानेवारी) भोसरीमध्ये 500 गडकोट किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याचा जागतिक विक्रम होणार आहे. इयत्ता 3 री ते 10 वीतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची व गडकोट किल्ल्यांची माहिती व्हावी व या गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने विश्वविक्रमी ‘किल्ले बनवा’ हा जागतिक विक्रमाचा उपक्रम व राज्यस्तरीय ‘युवा महोत्सव’ हे आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

शुक्रवारी (दि.27) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस यावेळी माजी महापौर नितीन काळजे, राहूल जाधव, कार्यक्रमाचे समन्वयक अजित सस्ते, नितीन मोरे, मनोज काळे, माधव कुलकर्णी, संदीप मोरे,  तळेकर, आनंद फुले,  सई तिकोने आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने यापूर्वी पर्यावरण जनजागृतीसाठी इंद्रायणी नदी सुधार उपक्रम, महिला बचत गटांना मोफत खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंद्रायणी थडीचा उपक्रम, रिव्हर साक्लोथॉन, स्वच्छता व वृक्ष लागवडीचे महत्व सांगण्यासाठी अवरित श्रमदान, विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना संधी देण्यासाठी मुलींचा कबड्डी व खो-खो संघ, मुला-मुलींचा कराटे संघ, भवानी तालीम व कुस्ती संघ, वारकरी सांप्रदाय व अध्यात्म क्षेत्रातील अध्यात्माचे महत्व सांगण्याच्या उद्देशाने किर्तन महोत्सव, रामायण व भागवत कथा महोत्सव असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

रविवारी (दि.5) भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील पटांगणावर आयोजित केलेल्या उपक्रमात इयत्ता 3 री ते 10 वी मधील 500 बालसंस्कार वर्ग सहभागी होणार आहेत. ते याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकलेल्या 500 गटकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारणार आहेत. सकाळी 9 वाजता या स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, प्रमुख पाहुणे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

श्री गुरुपीठाद्वारे या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची नोंद विश्वविक्रमात करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश मूल्य नाही. आजपर्यंत 497 बालसंस्कार वर्ग व युवा वर्ग संघांनी नोंदणी केली आहे. यामध्ये दुबई, व्हिएतनाम आणि पश्चिम महाराष्ट्रातील संघाचा सहभाग आहे. उपक्रमाचे उद्‌घाटन सकाळी 9 वाजता,  10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत किल्ले बनवणे उपक्रम होईल. दुपारी 1 ते रात्री 10 वा. व दुस-या दिवशी सोमवारी (दि. 6)  सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिवप्रेमींसाठी किल्ले पाहण्यासाठी खुले राहील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button