breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

सावधान! मासिक पाळीत ‘ही’ पेनकिलर खाताय? होऊ शकतो दुष्परिणाम

Meftal SPAS Pain Killer : अगदी छोट्या दुखण्यावर देखील आपण पेनकिलर घेतो. मात्र आता मेफ्टल स्पास या पेनकिलर संदर्भात केंद्र सरकारने एक अलर्ट जरी केला आहे. मासिक पाळीच्या वेळी पोटदुखीवर इलाज किंवा साधारण अंगदुखीवर इलाज म्हणून अनेक जण मेफ्टल स्पास घेतात. मात्र ही गोळी अनेक घरांमध्ये सहज उपलब्ध असते. तुम्हीही अशा कारणासाठी मेफ्टाल स्पास गोळी घेत असाल तर सावधान! या गोळीचा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.

मेफ्टाल स्लासचा वापर करणाऱ्यांनो सावधान!

केंद्र सरकारने पेनकिलर मेफ्टाल स्पासच्या वापराबाबत इशारा दिला आहे. या गोळीचं सेवन करताना काळजी घेण्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. या गोळीमध्ये आढळणारे मेफेनेमिक ॲसिड गंभीर एलर्जिक रिएक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतं. मेफेनेमिक ॲसिड ड्रेस सिंड्रोम निर्माण करु शकतो त्यामुळे याचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी सरकारने इशारा दिला आहे.

हेही वाचा  –  मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा 

संधिवात, ऑस्टियोआर्थरायटिस यासारखे हाडांचे रोग, तसेच मासिक पाळीत वेदना, सामान्य वेदना, सूज, ताप आणि दातदुखी यावर उपचार करण्यासाठी या पेनकिलरचा वापर केला जातो.

अलर्टमध्ये काय म्हटलं?

आयपीसीने (Indian Pharmacopoeia Commission) ३० नोव्हेंबरला जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटलं आहे की, डॉक्टर, रुग्ण आणि ग्राहकांना औषध Meftal Spas च्या वापराशी संबंधित दुष्परिणामांच्या संभाव्यतेचे बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. औषध घेतल्यानंतर तुम्हाला शरीरात कोणत्याही प्रकारची रिॲक्शन दिसल्यास संबंधितांनी www.ipc.gov.in किंवा Android मोबाइल ॲप ADR PvPI आणि PvPI हेल्पलाइनद्वारे एक फॉर्म भरून मदत मिळवू शकता आणि तक्रार नोंदवू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button