breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

पुणे : विधानसभेत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबद्दल चर्चा सुरू असून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षणावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्य सरकारकडे सुपूर्द केला असून राज्य सरकारने तो स्वीकारला आहे.

आनंद निरगुडे यांचा आयोगाचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी २०२४ पर्यंत कार्यकाळ होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरीटीव्ह पिटीशनवर सुनावणी प्रलंबित असतानाच राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा  –  मनोज जरांगे पाटलांची भाषणादरम्यान प्रकृती खालावली, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

राज्य मागासवर्ग आयोग हा मागासवर्गातील जातीची माहिती गोळा करण्यासाठी आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे. आयोग हा स्वायत्त आहे पण माहिती देण्यासाठी आयोगावर सरकारकडून दबाव टाकण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणातून आलेली माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो, परंतु सरकारला अपेक्षीत माहिती देणे आम्हाला शक्य नाही. जी माहिती आमच्याकडे आहे तीच माहिती पुरवू शकतो, असे आयोगाच्या सदस्यांचे म्हणणे होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button