breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

तारापूर औद्योगिक वसाहतीत भीषण आग

तारापूर | महाईन्यूज

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या श्री साई एंटरप्राईस (पूर्वीची हर्षल केमिकल) कंपनीत आज भीषण आग लागली. या आगीमध्ये एक कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या लगत असलेल्या अन्य कारखान्यांना देखील काहीप्रमाणात आगीची झळ पोहचल्याचे दिसून आले. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक टी-१०१ मध्ये असलेल्या या कंपनीस सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास आग लागली होती. रसायनाने भरलेल्या टँकरमधून ज्वलनशील पदार्थ ड्रममध्ये भरले जात असताना घर्षणाने ठिणगी पडल्याने या ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतला. या कंपनीमध्ये ज्वनालाशील रसायनाचा मोठा साठा असल्याने आगीच्या ज्वाळा मोठ्याप्रमाणावर बाहेर येत होत्या.

घटनेबाबत माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आग नियंत्रणाता आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.या आगीमध्ये कंपनीतील एक कामगार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले आहे. ही आग लवकर आटोक्यात न आल्याने कंपनीलगतच्या अन्य उद्योगांचे देखील थोड्याफार प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी पालघरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणाहून पाच ते सहा अग्निशामक बंब बोलवण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button