breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

शहरातील कोविड केअर सेंटरवर सीसीटीव्हीच्या नियंत्रण ठेवा!

भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दिपक मोढवे-पाटील यांची मागणी

राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना सरकारी तसेच खासगी कोविड केअर सेंटरमध्ये प्रवेश करता येत नाही. परिणामी रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील सोयी-सुविधा आणि उपचारांबाबत रुग्णालय प्रशासन व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोविड केअर सेंटर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणात आणावेत, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष तथा माजी शहर उपाध्यक्ष दिपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.
दिपक मोढवे-पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शासकीय तसेच खासगी कोविड केअर सेंटरमध्ये नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच, कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. आठ ते दहा दिवस काही रुग्ण सेंटरमध्ये दाखल असतात. मात्र, कोविड सेंटरमध्ये संबंधित रुग्णांच्या उपाचार, सोयी-सुविधा यांबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरीक करीत आहेत. अनेकदा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला तरीही संबंधित कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते.
वास्तविक, आरोग्य सुविधेवर प्रचंड ताण आहे. पण, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांचाही संताप अनावर होतो. परिणामी, अनेक ठिकाणी नातेवाईक आणि सेंटरमधील कर्मचारी यांच्यात वादावादी होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने पिंपरी-चिंचवडमधील कोविड केअर सेंटर सीसीटीव्हीच्या नियंत्रणात ठेवावे. त्याच धर्तीवर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अंमलबजावणी करावी. तसेच, संबंधित सीसीटीव्ही सेंटरमधील कंट्रोल रुम महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणात असावी, अशी मागणी दिपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांनाही साकडे…
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनाही कोविड केअर सेंटरमधील सोयी-सुविधांबाबत संवेदनशीलपणे लक्ष घालावे, अशी मागणी दिपक मोढवे-पाटील यांनी केली आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि उपलब्ध सोयी-सुविधा याचा विचार करुन ४-५ स्टार हॉटेल्सच्या रुम्स ताब्यात घेता येतील का? त्याठिकाणी रुग्णांना बेडची व्यवस्था करता येईल का? तसेच खासगी रुग्णांलय आणि डॉक्टरांची सेवा अधिगृहीत करावी, याबाबत सकारात्मक विचार करावा, असेही दिपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button