breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: भारताच्या दहशतीने सीमेजवळ पाकिस्तानची F-16 विमानं घालतायत घिरटया

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक झाला आहे. भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होण्याची चिंता पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळेच पाकिस्तानने सीमेजवळ हवाई गस्त वाढवली आहे. 

हंदवाडा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सच्या हवाई कसरती सुरु होत्या. भारताला याबद्दल माहिती होती. हंदवाडा चकमकीमध्ये कर्नल, मेजरसह तीन जवान असे एकूण पाच जण शहीद झाले. या घटनेनंतर पाकिस्तानी एअर फोर्सने गस्त वाढवली आहे. यामध्ये F-16 आणि JF-17 या फायटर विमानांचा समावेश आहे.

पाकिस्तानी एअर फोर्सच्या प्रत्येक हालचालीवर भारताचे बारीक लक्ष आहे. भारताने यापूर्वी उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. भारत आताही अशीच कारवाई करु शकतो ही भिती पाकिस्तानला आहे. इम्रान खान यांनी केलेल्या टि्वटमधूनही पाकिस्तानची चिंता स्पष्ट दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button