breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

राज्यात एक लाखाहून अधिक जणांना ‘डोळे आले’, अशी घ्या काळजी

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत डोळे येण्याची साथ फोफावत आहे. राज्यात सर्वाधिक रूग्णसंख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. राज्यात ३१ जुलैपर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक रूग्ण सापडले आहेत. त्यातील ८ हजार ८०८ रूग्ण पुण्यातील आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये २० जुलैपासून शहरातील २७२३ जणांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यात शाळेतील मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. दिवसाला ३०० जणांना प्रादुर्भाव होत आहे. यापैकी एकाही जणाला रूग्णालयात दाखल करावे लागले नाही. महापालिकेच्या सर्व रूग्णालयात या रूग्णांवर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा – वाकड पोलिसांची मोठी कारवाई, दुचाकी चोरणारी जळगावातील टोळी जेरबंद

डोळे येण्याची लक्षणे :

  • डोळे लाल होणे
  • वारंवार पाणी येणे
  • डोळ्याला सूज येणे

अशी घ्या काळजी :

  • वैयक्तिक स्वच्छता ठेवणे
  • वारंवार हात धुणे
  • डोळ्यांना हात न लावणे
  • डोळे आलेल्या व्यक्तीचे घरातच विलगीकरण
  • परिसर स्वच्छ ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button