breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विधानसभेत विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

मुंबई : अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पद सोडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. विधानसभेत महाविकास आघाडी विरोधी बाकावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांपैकी काँग्रेसचे संख्याबळ विधानसभेत जास्त असल्याने या रिक्त जागेवर काँग्रेसला संधी देण्यात आली आहे. त्यानुसार, काँग्रेस नेचे विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – राज्यात एक लाखाहून अधिक जणांना ‘डोळे आले’, अशी घ्या काळजी

काँग्रेसने १ जुलै रोजी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. राहुल नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेते पद नियुक्तीला मान्यता दिली आहे. आज विधानसभेत याबाबत घोणषा करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button