breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पिंपरी-चिंचवडमधील बेकायदा भंगार दुकानांवर कारवाई करा’; राजू दुर्गे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीर भंगार दुकाने सक्रिय आहेत या भंगार माफिया तसेच मागील काही दिवसात शहरातील बेकायदेशीर व्यवसायिकांमुळे ज्या दुर्घटना झाल्या आहे त्यांना आळा बसावा या करिता त्यांचे विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व पक्ष प्रवक्ते राजू दुर्गे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे.

राजू दुर्गे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, तळवडे ज्योतिबा मंदिर पाठीमागे स्पार्कल कॅण्डल कंपनीमध्ये भयंकर स्फोट होऊन भयानक आग लागून नऊ महिला कामगार मृत्यू पावल्या असून इतर महिला कामगार गंभीर अवस्थेत जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तसेच पिंपरी चिंचवड शहरात निगडी येथील मुंबई पुणे महामार्गावर गॅस सिलेंडर टँकर पलटी होऊन गंभीर जीवितहानी टाळली होती त्यामुळे निगडीतील नागरिकांनी सुटकेचा निस्वास घेतला त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून दुर्घटना घडू दिली नाही, त्यानंतर शाहूनगर येथील हार्डवेअर दुकानाला आग लागून चार जण मरण पावले होते तसेच वाकड येथील गॅस सिलेंडर रिलीफ करताना भयंकर स्फोट घडला होता त्यामुळे कोणती जीवितहानी घडली नाही तसेच शाळेच्या आवारात चोरीचे प्रकार करून गॅस सिलेंडर मधून चोरून दुसऱ्या गॅस सिलेंडर मध्ये भरताना भयंकर स्फोट झाला त्यावेळी शाळेला रविवारी सुट्टी असल्याने कोणती जीवितहानी झाली नाही नंतरच्या काळात गेल्या महिन्यात निगडी येथील सेक्टर २२ दळवी नगर मध्ये भंगार गोडाऊन मध्ये आग लागून चार घरे भासमसात झाली तर एक दुकान जळून खाक झाले होते या सर्व घाटांची संपूर्ण जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त यांची आहे’ हे नाकारता येणार नाही.

हेही वाचा – मोठी बातमी! संसदेचं कामकाज सुरू असताना २ जण शिरले, एक जण महाराष्ट्रातील

तसेच बीट मार्शल निरीक्षक अवैध बांधकाम प्रकरणी आर्थिक देवाण-घेवाण करून बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी मदत करतात त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील तळवडे व परिसरातील रेड झोन भागात मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे होत आहेत, शासकीय अधिकारी यांच्या आशीर्वादामुळे तसेच आर्थिक हितसंबंधांमुळे अनधिकृत बांधकामांची संख्या राजरोस वाढत आहे या भागात बेकायदेशीर बांधकाम मुले बकालपणा निर्माण झाला असून फायर ब्रिगेड परवानगी देत नाही त्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करून नागरिकांच्या जीवांचे रक्षण करावे लागते प्रशासनाने जबाबदारी निश्चित करून ज्या ठिकाणी आग लागून दुर्घटना घडली त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी मनपा बांधकाम परवाना बीट मार्शल निरीक्षक तसेच प्रशासन यंत्रणा यांना जबाबदार धरावे.

तसेच भंगार गोडाऊन मध्ये लाखो रुपयांची भंगार गोळा करून विल्हेवाट लावण्यात येत असून पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी, मोशी, चिखली, तळवडे, निगडी या भागातील भंगार गोडाऊनमध्ये करोडो रुपये किमतीचे भंगार गोळा करून साठवून ठेवल्यामुळे साथीचे आजार उद्भवू लागले असून डेंगू ,मलेरिया सारखे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत ,लोखंडी रॉड ,लोखंडी अँगल ,लोखंडी पाईप ,लोखंडी पत्रे, लोखंडी खेळणी, लाकडी साहित्य, वायर, रद्दी पेपर ,प्लास्टिक गोळा करून गोडाऊन मध्ये साठवून ठेवून विल्हेवाट लावण्यात येत आहे याकडे पोलीस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत असून त्या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राजू दुर्गे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button