पिंपरी / चिंचवड

पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तडीपार गुंडाला अटक

पिंपरी | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीने पोलिसांची परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. तसेच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने दमदाटी करत धक्काबुक्की केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडली.

वीरेन्द्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय 23, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वीरेंद्र याला सन 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याने तडीपारीचा आदेशाचा भंग करून तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी पोलिसांची परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी त्याने पोलीस शिपाई गोविंद डोके यांना धक्काबुक्की केली. दोन्ही हाताने ढकलून ‘मला कोण पकडते’, असे म्हणत आरडाओरडा करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी वीरेंद्र याला ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button