पिंपरी / चिंचवड

तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 16) सकाळी बालाजीनगर झोपडपट्टी भोसरी येथे करण्यात आली.

निलेश सुनील पवार (वय 26, रा. आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश पवार याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 24 ऑगस्ट 2020 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. त्याने बेकायदेशीरपणे कोयता बाळगून बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात दहशत निर्माण केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास कारवाई करून त्याला अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button