पिंपरी / चिंचवड

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान तरुणास शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

पिंपरी l प्रतिनिधी

वाकड पोलिसांनी सोमवारी (दि. 16) केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एका तरुणाला कोयता बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास वाकड येथे करण्यात आली.

वैभव राजू वावरे (वय 20, रा. भक्ती शक्ती चौक, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार बाबाजान पोपट इनामदार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांनी वाकड परिसरात सोमवारी मध्यरात्री कोम्बिग ऑपरेशन केले. त्यात पोलिसांना एक तरुण कोयता बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वैभव वावरे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 150 रुपये किमतीचा एक कोयता आढळून आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button