breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सोलापुरात दोन खासदार, सात आमदारांसह महापौरांवर गुन्हा

  • बेकायदा मराठा आक्रोश मोर्चा

सोलापूर |

मराठा आरक्षण प्रश्नावर पोलिसांची परवानगी धुडकावून काल रविवारी बेकायदा मराठा आक्रोश मोर्चा काढल्याप्रकरणी दोन खासदार, सात आमदार, महापौरांसह ४६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्वावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींसह अन्य कलमे लावण्यात आली आहेत.

मराठा आक्रोश मोर्चाचे प्रमुख आयोजक किरण शंकर पवार (रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) व राम अनिल जाधव (रा. राघवेंद्रनगर, मुरारजी पेठ, सोलापूर) आणि मोर्चाचे नेतृत्व केलेले आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, माढय़ाचे खासदार रणजितसिंह नाईक—निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते—पाटील, विजय देशमुख, राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते व आमदार समाधान अवताडे यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याशिवाय महापौर श्रीकांचना यन्नम व पालिका सभागृहनेते शिवानंद पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, नगरसेवक अमर पुदाले, नागेश भोगडे, विनायक विटकर, संतोष भोसले, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विजयकुमार डोंगरे, राजू सुपाते, बिज्जू प्रधाने, मतीन बागवान, अमीर यासीन मुलाणी, मोहन डांगरे, निखील भोसले यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button