ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

पवारांच्या निवासस्थानावरील आंदोलनाची पोलिसांना आधीच माहिती होती; सदावर्तेंच्या FIR मधून मोठे खुलासे

औरंगाबाद |एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर आंदोलन करण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना आधीच होती असा खुलासा गुणरत्न सदावर्तेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या एफआयआरमधून समोर आले आहे. एसटी कर्मचारी हे विविध राजकिय पक्षाच्या नेते, खासदार, आमदार व मंत्री यांच्या निवासस्थानी आंदोलन करतील अषा आषयाचे गोपनीय माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती, असा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

सदावर्तेंच्या विरोधात दाखल गुन्ह्यातील एफआयआरमध्ये पोलिसांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एसटी कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. सदर आंदोलनाच्या अनुशंगाने काही व्यक्तींच्या चिथावणीनुसार एसटी कर्मचारी हे विविध राजकिय पक्षांची नेते, खासदार, आमदार व मंत्री यांच्या निवासस्थानी सुध्दा आंदोलन करतील अषा आषयाचे गोपनीय माहिती प्राप्त होत असे. त्या अनुषंगाने गांवदेवी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये राष्ट्रवादी काग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार यांचे सिल्वर ओक इस्टेट, भुलाभाई देसाई रोड, मुंबई या ठिकाणी निवासस्थान असून, तेथे तसेच इतर रायल स्टोन या मंत्रीमहोदयांचे निवासस्थानी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येत होता.

दरम्यान सदावर्तें यांनी दिलेल्या चिथावणीच्या अनुशंगाने शुक्रवारी ( ०८.०४.२०२२ ) रोजी एसटी कामगार सिल्वर ओक या ठिकाणी येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली होती, असं पोलिसांनी म्हटल आहे.

बंदोबस्त तैनात केल्याचा पोलिसांचा दावा…

शरद पवारांच्या घरी आंदोलक येऊ शकतात अशी माहिती मिळाल्याने, साधारण दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावदेवी मोबाईल – १ व इतर पोलीस अंमलदारासह बी.डी. रोडकडून सिल्वर ओककडे जाणाया रस्त्यावरती तैनात करण्यात आले होते असं एफआयआरमध्ये म्हटल आहे. तसेच आंदोलनकर्ते आल्यास त्यांना रोखता यावे याकरीता त्याठिकाणी बरिकेटींग करण्यात आली होती असेही पोलिसांनी म्हटल आहे. त्यामुळे जर पोलीस असताना आंदोलक आतमध्ये कसे घुसले असाही प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button