breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

स्वीडनचे पंतप्रधान विश्वासदर्शक ठरावात पराभूत

स्टॉकहोम |

स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफव्हेन यांचा सोमवारी संसदेत मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावात पराभव झाला आहे. गृहनिर्माण क्षेत्रासमोरील संकट आणि रीअल इस्टेटच्या गगनाला भिडलेल्या किमती या स्थितीत मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये पंतप्रधानांचा पराभव झाला. विश्वासदर्शक ठरावात पराभूत होणारे स्वीडनमधील ते पहिलेच पंतप्रधान आहेत. स्वीडनमधील द्विपक्षीय अल्पमतातील सरकारमध्ये सहभागी नसलेल्या, परंतु घटक पक्ष असलेल्या छोटय़ा डाव्या पक्षाने विश्वासदर्शक ठरावात पंतप्रधानांचा पराभव होण्यासाठी मतदान केले.

स्वीडनमधील गृहनिर्माण क्षेत्रात गगनाला भिडलेल्या दरांमुळे पंतप्रधानांच्या विरोधात मतदान करण्यात आले. स्वीडनमध्ये पुढे काय होणार आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही, आपण मतदानापर्यंत प्रतीक्षा करणार आहोत आणि स्वीडनसाठी कोणती बाब योग्य आहे त्याचा विचार करणार आहोत, असे लॉफव्हेन यांनी गेल्या आठवडय़ात म्हटले होते. मुदतपूर्व निवडणुका घ्यावयाच्या का, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांकडे एका आठवडय़ाची मुदत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button