ताज्या घडामोडीपुणे

स्पर्धा परीक्षार्थीच्या समस्या सोडवण्यासाठी ‘सुयोग अ‍ॅप’

प्रलंबित ६,९९८ उमेदवारांच्या मुलाखती तत्काळ

पुणे | केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) सदस्य संख्या वाढवण्यात येणार आहे. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधी प्रसिद्ध करण्याबाबतच्या सूचना आयोगाला देण्यात आल्या आहेत.

२०१९ पासून पात्र असलेल्या ६ हजार ९९८ उमेदवारांच्या रखडलेल्या मुलाखती घेण्याच्या, नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील, असे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट के ले. तसेच स्पर्धा परीक्षार्थीच्या अडचणी सोडवण्यासाठी सुयोग अ‍ॅप तयार करण्याच्या सूचना आयोगाला दिल्याचे त्यांनी नमूद के ले.‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रवादी चर्चा’ या उपक्रमाअंतर्गत समाजमाध्यमांद्वारे भरणे यांनी स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी संवाद साधला. एमपीएससीसंबंधित विविध मुद्यांवरील कार्यवाहीबाबत त्यांनी माहिती दिली. स्वप्नील लोणकर या उमेदवाराने काही दिवसांपूर्वी आत्महत्या के ल्यानंतर, नियुक्ती रखडलेल्या उमेदवारांच्या आंदोलनानंतर एमपीएससीसंबंधित विविध विषय चर्चेत आले आहेत.

भरणे म्हणाले, की ५ जुलैच्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रियेची कार्यवाही के ली जाईल. २०२०-२१मध्ये आयोगाने घेतलेल्या पूर्व परीक्षांचे निकालही घोषित के ले जातील. रखडलेल्या सर्व परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे नियोजन आहे.

एमपीएससीतील सदस्यांच्या चार रिक्त जागांवर ३१ जुलैपूर्वी नियुक्ती करण्यात येणार आहे. आयोगाने शिफारस के लेल्या ८१७ उमेदवारांना तातडीने नियुक्तीची देण्याची कार्यवाही करण्यात येईल. एमपीएससीची प्रक्रिया येत्या काळात गतिमान करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षार्थीच्या अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन केंद्रही सुरू के ले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button