breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये महापौर चषक राष्ट्रीय बॉडी बिल्डींग स्पर्धा संपन्न

पिंपरी, (महाईन्यूज) – महापालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स यांचे मान्यतेने व पिंपरी चिंचवड अँमेच्युअर बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय बॉडी बिल्डींग स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवार (दि. २५) ते शनिवार (दि. 29) या काळात माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) महापौर चषक ५९ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डींग (वरिष्ठ) स्पर्धेचे उद्घाटन महापौर राहूल जाधव यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतीक समिती सभापती तुषार हिंगे, नगर सदस्य बाबा त्रिभुवन, राजू मिसाळ, शीतल शिंदे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त आशा राउत, क्रीडाअधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, अनिता केदारी, इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशनचे सचिव संजय मोरे, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे राजेंद्र साजपुरकर, अँमेच्युर बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव राजेश सावंत हे उपस्थित होते.

या स्पर्धेत ३०० पुरूष व महिला खेळाडूंनी आपापल्या राज्यांचे प्रतिनिधित्व करत विविध वजन गटात सहभाग नोंदविला. आज प्रत्येक वजन गटातील बेस्ट सिक्स (उत्कृष्ट सहा) बिल्डर्स निवड समितीकडून निवडले गेले. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन जयंश्री साळवी यांनी केले. स्पर्धेचे कामकाज स्पर्धा प्रमुख अनिल मगर, रंगराव कारंडे, बन्सी आटवे, लक्ष्मण माने, भाउसाहेब खैरे यांनी पाहिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button