breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमधील करोडपती PSI सोमनाथ झेंडे यांचं निलंबन!

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आला आहे. पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचे म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात येणार आहे.

क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडेंनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ते अव्वल ठरले. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले होते. दीड कोटींची त्यांना लॉटरी लागली होती. यावेळी झेंडे यांनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या अन हीच चूक त्या आनंदावर विरजण टाकणारी ठरली.

हेही वाचा – पुण्यातील अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला चेन्नई येथून अखेर अटक!

मिळालेल्या माहीतीनुसार, ड्रीम ११ या ऑनलाईन खेळावर काही राज्यात बंदी आहे , हा खेळ जोखमीचा असल्याने तो सट्टा ठरतो. पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी यांचे आर्थिक उत्पंनाचे साधने कायदेशीर असावेत असा नियम आहे. याशिवाय कोणत्याही खेळ प्रकारात भाग घेताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. ती परवानगी झेंडे यांनी घेतली नव्हती. विशेष म्हणजे ऑन ड्युटी असे खेळ खेळणे गैर वर्तनुकीची कृती असल्याचा ठपका देखील झेंडे यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती मिळतेय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button