breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नीरव मोदीच्या गैरव्यवहारामुळे पीएनबीला 14,357 कोटींचा तोटा

मुंबई – नीरव मोदीने केलेल्या गैरव्यवहारामुळे पंजाब नॅशनल बॅंकेला एकूण 14, 357 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेने आज यासंदर्भातील तोट्याची आकडेवारी प्रसिद्ध केली. पंजाब नॅशनल बॅंकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेतल्या काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबरोबर संगनमताने ज्वेलर नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बनावट “लेटर ऑफ अंडरस्टॅंडिंग’ मिळवून भारतीय बॅंकांच्या परदेशातील शाखांना सादर केली होती. यासाठी “स्वीफ्ट’ मेसेजिंग सिस्टीमचा दुरुपयोगही करण्यात आला होता.

सीबीआयने कालच या गैरव्यवहारप्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये नीरव मोदी आणि त्याचा भाऊ निशाल मोदीच्या उद्योगांचा तपशील देण्यात आला आहे. याशिवाय नीरव मोदीच्या कंपनीतील एक्‍झिक्‍युटिव्ह सुभाष परब याचाही या आरोपपत्रामध्ये उल्लेख आहे.

बनावट “लेटर ऑफ अंडरस्टॅंडिंग’ आणि “फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट’मुळे बॅंकेला 6,586.11 कोटी रुपयांचे देणे लागू झाले आहे. बॅंकेच्या चौथ्या तिमाहीच्या नियमित फायलिंगमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. या “लेटर ऑफ अंडरस्टॅंडिंग’च्या संदर्भातील देणी संबंधित बॅंकांना निर्धारित वेळेमध्ये दिली जातील. ही देणी दिल्यानंतर चुकते करायची एकूण रक्कम 14,356.84 कोटी रुपये इतकी होणार आहे, असेही “पीएनबी’ने म्हटले आहे.

या गैरव्यवहाराच्या रकमेच्या बदल्यात आर्थिक तरतूद करण्याची परवानगी रिझर्व बॅंकेने “पीएनबी’ला दिली आहे. “पीएनबी’ने आवश्‍यक असलेल्या रकमेपेक्षा अधिक 7,178.42 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उर्वरित 7,178.42 कोटी रुपयांची तरतूद आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये करण्यात येणार आहे.

जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये बॅंकेला 13,416.91 कोटी रुपयांच तोटा झाल्याचे बॅंकेने म्हटले आहे. ही रक्कम प्रामुख्याने बुडीत कर्जांच्या तरतूदीसाठी करण्यात आली होती. तर 2016-17 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये 261.90 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे बॅंकेने म्हटले आहे. चौथ्या तिमाहीतील एकूण उत्पन्नही 14,989.33 कोटी रुपयांवरून 12,945.68 कोटी रुपयांपर्यंत घटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button