ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र
संपातील निलंबित एसटी कर्मचार्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
![Suspended ST employee dies of heart attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/st-worker.png)
लातूर | अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे या आंदोलनातील काही कर्मचाऱ्यांवर महामंडळाने कारवाई केली आहे.अशाच निलंबन कारवाई करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडली आहे. सतीश मधुकर चपटे (४२)असे या मरण पावलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सतीश मधुकर चपटे यांच्यावर महामंडळाने दोन महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी मागील चार महिन्यापासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकाराला होता. त्यामध्ये ते पुढे असल्याने त्यांना ८ जानेवारी २०२२ रोजी महामंडळाने निलंबित केले होते.निलंगा आगारात सतीश मधुकरराव चपटे हे कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परीवार आहे