breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Pune : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची तारीख आणि केंद्रे जाहीर

२४ वर्षांनंतर होणार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक

पुणे : २४ वर्षांनंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. यासाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी केंद्रे शनिवारी जाहीर करण्यात आली आहेत. तर मतमोजणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी मतदारसंघनिहाय मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. १८ जागांसाठी १७ हजार ८१२ जण मतदान करणार आहेत. सेवा सहकारी संस्था गटातून सर्वाधिक ११ उमेदवार निवडून येणार आहेत. ग्रामपंचायत गटातून चारजण, व्यापारी-आडते गटातून दोनजण आणि हमाल, मापाडी गटातून एक उमेदवार निवडून येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली.

व्यापारी, आडते गटात सर्वाधिक मतदार असून, या गटातील निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणुकीसाठी दोन पॅनल समोरासमोर असून, व्यापारी गटातील पॅनलने कोणालाही पाठिंबा दिला नाही. या गटातील प्रत्येकी दोन उमेदवारांनी पॅनल तयार केला आहे.

मतदार संघमतदारांची संख्यामतदानाचे ठिकाण
सहकारी सेवा संस्था१९१८ मतदारसातव पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल, अरण्येश्वर
ग्रामपंचायत७१३ मतदारसातव पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल, अरण्येश्वर
व्यापारी, अडते१३ हजार १७४ मतदारश्री शिवाजी मराठा हायस्कूल, शुक्रवार पेठ
व्यापारी, अडते२ हजार ७श्री शिवाजी मराठा हायस्कूल, शुक्रवार पेठ
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button