breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमुंबईराजकारणराष्ट्रिय

भाजप नेते काय धुतल्या तांदळासारखे आहेत का?, ईडीच्या कारवाईत भाजप नेते का नाहीत; छगन भुजबळांचा संतप्त सवाल

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

ईडीने कारवाई केलेल्या यादीत एकही भाजप नेते नाहीत. ते फक्त धुतल्या तांदळासारखे आहेत का? केंद्रीय यंत्रणा या स्वतंत्र आहेत असे सांगता हा काय दांभिकपणा आहे. तुमच्याकडे गेल्यावर शुभ्र कसा होता. शिखंडीसारखे का लढता असा संतप्त सवालही छगन भुजबळ केंद्रसरकारला केला.

ईडीची कारवाई का तर लवकर जामीन नाही म्हणून… नवाब मलिक, अनिल देशमुख यांची काय केस आहे हे सर्वांना माहीत आहे ते नक्की बाहेर येतील असे सांगून पवारसाहेब आपल्या कार्यकर्त्यांना एकटं सोडत नाहीत असेही आवर्जून छगन भुजबळ यांनी सांगितले.

आपल्या संस्कृतीचा आम्हाला आदर आहे. ६० महिलांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यातील एकाही महिलेच्या कपाळावर टिकली नव्हती. आपल्या अगोदर १२० देशात टिकली लावली नव्हती. आता चक्र उलट फिरत आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

एकनाथ शिंदे शेती करत आहेत म्हणून ते मनोहर भिडे आंब्याची झाडे लावा सांगायला गेले असावेत. त्यांच्यात नेमकी चर्चा काय झाली माहीत नाही मात्र फार मोठे राजकारण सुरू आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कपाळावर भलंमोठं कूंकू होतं तरीपण त्यांच्यावर दगड, शेण का मारले.अशा मनुवादी लोकांच्याविरोधात लढण्यासाठी ताकद छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्याकडून मिळते. सध्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला.

आता दिवाळी झाली काही जणांना खायलाही मिळाले नाही आनंदाचा शिधा तर लोकांच्या घरी पोचलाच नाही. नोटेवर देवांचे फोटो छापा अशी मागणी करता अरे आधी लोकांच्या हातात पैसा द्या मग नोटांवर फोटो छापा असे खडेबोल छगन भुजबळ यांनी सुनावले.

एसटी विलीनीकरण करण्यासाठी पवारसाहेबांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. आता तुमचं सरकार आलं ना मग का एसटीचे विलिनीकरण होत नाही, का आंदोलन होत नाही असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री बोलत आहेत मोठ्ठा प्रकल्प राज्यात येणार आहे. मात्र त्यांनी फॉक्सकॉन प्रकल्प नेला आणि आपल्याला पॉपकॉर्न दिला आहे अशा शब्दात छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका केली.

महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे काम होतेय. महाराष्ट्राला कमकुवत करु नका महाराष्ट्र हा देशाचा आधार आहे हे लक्षात ठेवा असा स्पष्ट इशाराही छगन भुजबळ यांनी दिला. गुजरात मॉडेल मोरबी पुल कोसळला त्यात दीडशे माणसं मृत्युमुखी पडली. युकेच्या पंतप्रधानांनी आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि मी गेली आठ वर्ष पंधरा लाख रुपये कधी मिळणार याची वाट बघत आहे असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button