breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

चेतन चौहान यांना हॉस्पिटलमध्ये मिळाली अपमानास्पद वागणूक

लखनऊ | उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांना हॉस्पिटलमध्ये अपमानास्पद वागणूक मिळाली. लखनऊच्या संजय गांधी आयुर्विज्ञान संस्थान येथे हा प्रकार घडला, असा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य सुनिल साजन यांनी केला.

उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे कोरोना आणि शरीरातले अनेक अवय निकामी झाल्यामुळे निधन झाले. मात्र सुनिल साजन यांनी सभागृहात दिलेल्या माहितीमुळे चेतन चौहान यांना एसजीपीजीआय हॉस्पिटलमध्ये मिळालेल्या वागणुकीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चेतन चौहान एसजीपीजीआय हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. तिथे त्यांना हॉस्पिटलच्या एका डॉक्टरने तसेच त्याच्या सोबतच्या काही कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली, असे समाजवादी पार्टीचे आमदार सुनिल साजन विधान परिषदेत म्हणाले.

राउंडवर असलेल्या डॉक्टरसोबत काही कर्मचारी आले होते. या मंडळींनी दूरुन चेतन चौहान यांच्याशी संवाद साधला. इथे चेतन कोण आहे, असे त्यांनी विचारले. चेतन चौहान यांचा स्वभाव अतिशय साधा आणि सरळ असल्यामुळे त्यांनी लगेच स्वतःची ओळख करुन दिली. माहिती मिळताच राउंडवर आलेल्यांनी कोरोना कधी झाला, असा प्रश्न विचारला. चेतन चौहान यांनी थोडक्यात माहिती दिली. यानंतर एकाने चेतन काम काय करतोस, असा प्रश्न केला. चेतन चौहान यांनी आपण कॅबिनेट मंत्री आहोत, अशी माहिती दिली. तर लगेच प्रश्न आला कोणाचे कॅबिनेट मंत्री? चेतन चौहान यांनी उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री असल्याची माहिती दिली. यानंतर प्रश्न विचारणाऱ्याने चेतन, घरात आणखी कोणाला कोरोना झाला आहे का, असा प्रश्न केला. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button