अजित पवार की देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, अवधूत गुप्ते यांच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
खुपते तिथे गुप्ते या पर्वाच्या आगामी भागाचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर आला आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांना अवधूत गुप्ते काही प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यादरम्यान अवधूतने सुप्रिया सुळे यांना विचारलं, उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहे? अजित पवार की देवेंद्र फडणवीस? तर त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थात अजित पवार. सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या उत्तराची सध्या चांगलीच चर्चा आहे.
हेही वाचा – संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर! संविधान सभेपासून आजपर्यंतच्या कामगिरीवर चर्चा होणार
काय उत्तरं देतील सुप्रिया सुळे?
पहा, ‘खुपते तिथे गुप्ते,
17 सप्टेंबर, रविवार, 9 PM#KhupteTitheGupte #Zeemarathi #Promo @AvadhootGupte pic.twitter.com/A41INKDSKK— Zee Marathi (@zeemarathi) September 14, 2023
दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’चा हा नवीन भाग प्रेक्षकांना येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे.