breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर! संविधान सभेपासून आजपर्यंतच्या कामगिरीवर चर्चा होणार

मुंबई : केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. एक देश एक निवडणूक, समान नागरी कायदा, भारत नाव बदलाचा निर्णय या अधिवेशनात होईल अशी चर्चा आहे. परंतु सरकारने आता तात्पुरत्या अजेंड्याची लिस्ट जाहीर केली आहे. या यादीत चार विधेयके मंजूर करण्याचा प्रस्ताव या विशेष अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे.

अधिवक्ता (दुरुस्ती) विधेयक – २०२३, द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियडिकल बिल – २०२३ ही दोन विधेयके लोकसभेत येणार आहेत. ही दोन्ही विधेयके ३ ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आली होती. तर, पोस्ट ऑफिस बिल, २०२३ आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि कार्यकाल) विधेयक २०२३ वर राज्यसभेत चर्चा होणार आहे. १० ऑगस्ट रोजी ही दोन्ही विधेयके राज्यसभेत सादर करण्यात आली होती.

हेही वाचा – मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

बुधवारी सरकारने सांगितले की, १८ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनापूर्वी १७ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये (लोकसभा आणि राज्यसभा) कोणताही प्रश्नोत्तराचा तास आणि अशासकीय कामकाज होणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button