breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट, सुप्रिया सुळे म्हणाल्या..

मुंबई : अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.

पुण्यातील बाणेरमध्ये शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबिय एकत्र आले होते. या भेटीनंतर आणि गप्पांनंतर अजित पवार विशेष विमानाने थेट दिल्लीला रवाना झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, यावरून सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – अन्न-पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो माणूस? वाचा सविस्तर..

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांची प्रकृती १०० टक्के ठिक नाही. त्यामुळे अजित पवारांना काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. त्यात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दिल्ली, मुंबई, आणि पुण्यात हवामान अतिशय वाईट आहे.

हा फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. एन. डी पाटील यांच्या पत्नी सरोजनी पाटील या शरद पवार यांच्या बहीण आहेत. एन. डी पाटील आणि शरद पवार यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला आहे. पण, व्यक्तिगत नात्यात कधीही दुरावा आला नाही. आमची व्यक्तिगत लढाई कुणाशीही नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button