breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुळशीचे काॅग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते आक्रमक, सामूहिक राजीनामे दिले

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

भोर-वेल्हा कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने मुळशी तालुक्‍यातील कार्यकर्ते आक्रमक व नाराज झाले आहे. आक्रमक झालेल्या मुळशीतील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत, अशी माहिती कॉंग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली आहे.

भोर-वेल्हे-मुळशी विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे यांना जनतेने सलग तिसऱ्यांदा बहुमताने निवडून आहे. सलग तीनदा निवडून आल्यामुळे संग्राम थोपटे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणे गरजेचे होते; परंतु त्यांना मंत्रिपद न देता डावलण्यात आले. या झालेल्या अन्यायचा निषेध म्हणून मुळशीतील कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले.

पुणे जिल्ह्यात कॉंग्रेस जिवंत ठेवण्याचे काम संग्राम थोपटे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यात कॉंग्रेसला एकही मर्त्रिपद न देता पक्षाने तसेच सरकारने कार्यकर्त्यांची दिशाभूल केली आहे. नाराज झालेले कार्यकर्त्यांसह मी सुद्धा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button