breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

महायुतीत पडणार मिठाचा खडा? मावळ लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा

पिंपरी | महायुतीत शिरूरच्या जागेवरून वाद सुरू असतानाच आता मावळ लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट आणि अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंना विरोध केला आहे. श्रीरंग बारणेंना भाजपमध्ये घेऊन कमळाच्या चिन्हावर उमेदवारी दिल्यास माझा विरोध कायम असेल, असं सुनील शेळके म्हणाले.

सुनील शेळके म्हणाले की, प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारीने माझ्या नेत्याकडे जे काय माझं मत आहे. माझ्या तालुक्यातील जनतेची भावना आहे ती मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिंपरी चिंचवड शहर, मावळ, कर्जत असेल किंवा पनवेल या भागांमध्ये देखील एक चांगली ताकद आहे. तालुक्यातील जनतेची भावना मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक नगरसेवक आणि तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार हे देखील राष्ट्रवादीसोबत आहेत. मावळमधील तीच परिस्थिती आहे. कर्जतची देखील त्याच पद्धतीने परिस्थिती आहे.

हेही वाचा      –        भोसरीमध्ये महिलांसाठी महिलांकडून महिला दिनानिमित्त महिलांचा ‘कीर्तन जागार’

मी युतीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे. पक्षाकडून जो निर्णय दिला जाईल, तो मला स्वीकारून काम करावं लागणार आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजितदादांकडे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आली पाहिजे. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत कधीही मावळ तालुक्याला लोकसभेची संधी मिळाली नाही. आम्हाला फक्त होय म्हणावं, आमचा उमेदवार तयार आहे. तो उमेदवार मावळ तालुक्यातून दीड लाख मतांची आघाडी घेऊन पुढे जाईल, असंही सुनील शेळके म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button