breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

उन्हाळ्यात थंड पाणी पिताय तर वेळीच सावध व्हा! होऊ शकतं मोठं नुकसान

Drinking Cold Water | उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. उन्हाचा कडाका सहन करणे ही हे फारच अवघड बाब आहे. अशा परिस्थितीत या ऋतूत थंड पाणीच लोकांचा आधार ठरतो. उन्हाळ्यात आपण उन्हातून घरी गेल्यावर आपण काहीही विचार न करता थंड पाणी पित असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का? थंड पाणी आरोग्यासाठी फारच धोकादायक ठरू शकते. या ऋतूत खूप थंड पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

हृदयाच्या ठोक्यावर वाईट परिणाम होतो : जर तुम्ही उन्हाळ्यात खूपच थंड पाणी पिट असाल तर जरा थांबा. कारण थंड पाण्याचा परिणाम तुमच्या हृदयाच्या गतीवर जास्त प्रमाणात होत असतो. थंड पाण्यामुळे आपल्या शरीरातील मज्जासंस्थेचे संतुलन बिघडते. त्यामुळे आपल्या हृदयाच्या ठोक्यांची गती मंद होते.

वजन वाढते : वजन वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली. जेवल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास लठ्ठ होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. यामुळेच डॉक्टर जेवल्यानंतर लगेच पाणी न पिण्याचा सल्ला देतात.

सर्दी-खोकला होऊ शकतो : या ऋतूत थंड पाणी प्यायल्याने लोकांना सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवल्यानंतर थंड पाण्याऐवजी सामान्य पाणी प्यावे.खरं तर थंड पाण्यामुळे आपल्या शरीरात भरपूर श्लेष्मा निर्माण होतो, त्यामुळे शरीरात संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

पचन प्रक्रिया कमकुवत होते : खूप थंड पाणी किंवा कोणतेही पेय तुमच्या रक्त पेशींवर परिणाम करते, ज्याचा थेट परिणाम आपल्या पचन प्रक्रियेवर होतो. थंड पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया कमजोर होते. याच कारणामुळे थंड पाणी टाळण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा     –      भोसरीमध्ये महिलांसाठी महिलांकडून महिला दिनानिमित्त महिलांचा ‘कीर्तन जागार’

रेफ्रिजरेटरचे थंड पाणी पिण्याचे काय तोटे आहेत?

पचनास हानी पोहोचवते : आयुर्वेदात असे मानले जाते की थंड पाणी किंवा प्यायल्याने पचनशक्ती कमजोर होते. पचनाला आग समजली जाते आणि शीत या प्रक्रियेत अडथळा म्हणून काम करते. आयुर्वेदानुसार, पचनाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी उष्णता आवश्यक असते, जी तोंडापासून सुरू होते आणि आतड्यात संपते. याशिवाय, काही संशोधनात असेही दिसून आले आहे की थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकसतात. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या सुरू होतात.

घसा खवखवणे : जेव्हा तुम्ही रेफ्रिजरेटरचे थंड पाणी पितात तेव्हा त्यातून श्लेष्मा निर्माण होतो, ज्यामुळे अनेकांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. यामुळे घसा खवखवणे, कफ, सर्दी आणि घसा सुजणे होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात थंड पाणी पिणे टाळावे.

डोकेदुखीची समस्या उध्दभवते : थेट सूर्यप्रकाश किंवा तीव्र उष्णतेतून आल्यावर थंड किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने डोकेदुखी होऊ शकते. थंड पाणी प्यायल्याने मणक्याच्या अनेक नसा थंड होतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होते. ही परिस्थिती सायनस ग्रस्त लोकांसाठी एक समस्या बनू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button