TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

कर्नाटकातील श्री गुरु मदिवलेश्‍वर लिंगायत मठाच्या प्रमुखांची आत्महत्या; खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाच्या आरोपाखाली कर्नाटकातील लिंगायत समाजाचे संत शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच कर्नाटकात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील श्री गुरु मदिवलेश्‍वर लिंगायत मठाचे प्रमुख बसव सिद्धलिंग स्वामी यांनी आत्महत्या केली. मठाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत त्यांच्या मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी पोलिसांना सापडली चिठ्ठी

बसव सिद्धलिंग स्वामी गुरु मदिवलेश्वर मठाचे प्रमुख होते. सोमवारी उशीर झाला तरी ते खोलीच्या बाहेर आले नाहीत म्हणून त्यांचा अनुयायी सिद्धलिंग स्वामींच्या खोलीत गेला तेव्हा त्याला स्वामींचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपास सुरु केला आहे. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत काय लिहले हे अद्याप कळाले नसून पोलीस स्वामींच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेत आहेत.

आत्महत्या केल्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार लैंगिक छळाबाबत काही ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आल्या होत्या. या ऑडिओमध्ये दोन महिला कर्नाटकातील काही मठांमध्ये घडलेलया लैंगिक छळाच्या प्रकरणांवर चर्चा करत होत्या. या चर्चेत बसव सिद्धलिंग स्वामींच्या नावाचाही समावेश होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बसव स्वामी चिंतेत होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button